Special Report | अजितदादा, अनिल परबांची सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत ठराव मंजूर
गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात येऊन तो मंजूरही करण्यात आलाय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते- परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडण्यात आला आहे.
Latest Videos