Special Report : कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत ‘हिमालया’ची चर्चा! का, कशामुळे?
कोल्हापुरातून कधीही लढण्यास तयार असून, निवडणूक हरलो तर हिमालयात निघून जाईन,' असे प्रत्युत्तर पाटील यांनी टीकाकारांना दिले होते. त्यांच्या याच व्हिडीओ धागा पकडत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांतदादांवर निशाणा साधला जातोय.
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी चंद्रकांत पाटलांनी चुटकी वाजवून चँलेंज दिलं होतं. आता कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवेळी महाविकास आघाडीनं दंड थोपटून ते चँलेंज स्वीकारलं आहे. निमित्त आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदासंघाची पोटनिवडणूक 12 एप्रिलला होणार आहे. मात्र, वर्षभरापूर्वी चंद्रकांत पाटलांनी दिलेलं हे चँलेज सोशल मीडियात चांगलंच व्हायरल होत आहे.
मूळ कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार झाले होते. त्या वेळी त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र, कोल्हापुरातून कधीही लढण्यास तयार असून, निवडणूक हरलो तर हिमालयात निघून जाईन,’ असे प्रत्युत्तर पाटील यांनी टीकाकारांना दिले होते. त्यांच्या याच व्हिडीओ धागा पकडत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांतदादांवर निशाणा साधला जातोय.
2019 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभेतून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव जिंकले होते. मात्र त्यांच्या अकाली निधनामुळे इथं पोटनिवडणूक होऊ घातली आहे. महाविकास आघाडी स्थापन होण्याआधी इथं युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत व्हायची. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीवेळी ही जागा काँग्रेसकडे होती, आणि युतीच्या कोट्यातून शिवसेना लढायची. मात्र मविआच्या प्रयोगानंतर शिवसेनेनं ही जागा काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे 3 विरुद्ध 1, म्हणजे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.