Special Report | मविआची मतं फुटली...भाजपनं बाजी मारली

Special Report | मविआची मतं फुटली…भाजपनं बाजी मारली

| Updated on: Dec 14, 2021 | 9:19 PM

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर च्या जागेवर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिलेला त्यांचा पराभव झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मतं मिळाली आहेत. काँग्रेस समर्थित उमेदवार 186 मतं मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना 1 मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.