Special Report | हे नाशिक की बिहार? जमीन मालकीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

Special Report | हे नाशिक की बिहार? जमीन मालकीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

| Updated on: Aug 11, 2021 | 10:44 PM

जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकामध्ये म्हणजे दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली. धक्कादायक म्हणजे हाणामारी आणि दगडफेकीचा सर्व प्रकार सुरु असताना पोलीस होते, मात्र काही वेळाने चक्क पोलिसांनीच घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पाहायला मिळत आहे.

जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकामध्ये राडा झाला. पोलिसांच्या समोरच दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. हाणामारीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नाशिकमध्ये खोडे नगर भागामध्ये 8 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकामध्ये म्हणजे दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली. धक्कादायक म्हणजे हाणामारी आणि दगडफेकीचा सर्व प्रकार सुरु असताना पोलीस होते, मात्र काही वेळाने चक्क पोलिसांनीच घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पाहायला मिळत आहे.