Special Report | Kirit Somaiya यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार? -Tv9

Special Report | Kirit Somaiya यांच्यावर गुन्हा दाखल, अटक होणार? -Tv9

| Updated on: Apr 07, 2022 | 9:43 PM

जवळपास दीड महिन्यांपासून, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, असा इशारा राऊत सोमय्यांना देत आहेत. आणि आता राऊतांनी INS विक्रांतवरुन घेरल्यानंतर सोमय्यांवर गुन्हाही दाखल झाला. विशेष म्हणजे जी 3 कलमं सोमय्यांवर लावण्यात आली. त्यात कलम 34 चाही समावेश, याचाच अर्थ पोलिसांना अटक करण्यासाठी वॉरंटची गरज नाही. त्यामुळं सोमय्यांना अटक होणार का ? अशी चर्चा सुरु झाली.

जवळपास दीड महिन्यांपासून, बाप-बेटे जेलमध्ये जाणार, असा इशारा राऊत सोमय्यांना देत आहेत. आणि आता राऊतांनी INS विक्रांतवरुन घेरल्यानंतर सोमय्यांवर गुन्हाही दाखल झाला. विशेष म्हणजे जी 3 कलमं सोमय्यांवर लावण्यात आली. त्यात कलम 34 चाही समावेश, याचाच अर्थ पोलिसांना अटक करण्यासाठी वॉरंटची गरज नाही. त्यामुळं सोमय्यांना अटक होणार का ? अशी चर्चा सुरु झाली. INS विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला. आणि माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. किरीट सोमय्यांसह त्यांचे पुल निल किरीट सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. कलम 420, कलम 406 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  कलम 420 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास 7 वर्षांपर्यंत जेल आहे.