Special Report | खेड पंचायत समितीच्या वादात संजय राऊत यांची उडी!
खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतरही आता खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा पाहायला मिळाला. दुसरीकडे बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का बसलाय. आज पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांनी निवड झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा खेड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समिती सभापतीपदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतरही आता खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच वरचष्मा पाहायला मिळाला. दुसरीकडे बहुमत असूनही शिवसेनेला जबर धक्का बसलाय. आज पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांनी निवड झाली. त्यामुळे बहुमत असूनही सभापतीपद गमावण्याची नामुष्की ओढावल्यानं शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र, शिवसेना सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानं सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला. इतकंच नाही तर या प्रकरणावरुन जोरदार हाणामारीही पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा एकदा खेड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.