Special Report | लढाई अस्तित्वाची, लढाई खऱ्या खोट्या हिंदुत्वाची?-tv9
ज्या ज्या नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या नेत्यांचा ठाकरे शैलीत समाचार होणार हे निश्चित. राज ठाकरेंचा भोंग्यांचा अल्टिमेटम. राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसेचा मुद्दा. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न असो. वा राणे पिता-पुत्रांकडून ठाकरे पिता-पुत्रांवरची टीका. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
एकीकडे मुंबईत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पोस्टर्स लावलेत, तर दुसरीकडे सभेचा टीझर प्रसिद्ध करुन सोशल मीडियावरही मुख्यमंत्री ठाकरेंच्या सभेसाठी वातावरण निर्मिती सुरु केलीय. 14 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर अर्थातच विरोधक असतील. मात्र कोणत्या मुद्यावरुन मुख्यमंत्री ठाकरे विरोधकांवर टीकेचे बाण सोडतील याची झलक शिवसेनेचे पोस्टर्स आणि टीझरमध्येच आहे. सभेच्या टीझरमध्ये ”खऱ्या हिंदुत्वाचा” असा उल्लेख आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये खरं हिंदुत्व कुणाचं यावरुनच लढाई सुरु आहे. युती तुटल्यापासून शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडलाय अशाच पद्धतीची टीका भाजप नेत्यांनी सातत्याने शिवसेनेवर केलीय. याच मुद्यावरुनच उद्धव ठाकरे भाजप आणि राज ठाकरेंवर निशाणा साधणार हे निश्चित. दुसरीकडे मुंबईत लावलेल्या पोस्टर्सवर घंटाधारी आणि गदाधारींचा आघात असाही उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी याच घंटाधारी हिंदुत्वावादी शब्दामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वार-पलटवार झाला होता.
सवाल जवाब होऊनच जाऊ दे अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरेंनी इशारा दिलाय. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या नेत्यांचा ठाकरे शैलीत समाचार होणार हे निश्चित. राज ठाकरेंचा भोंग्यांचा अल्टिमेटम. राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसेचा मुद्दा. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न असो. वा राणे पिता-पुत्रांकडून ठाकरे पिता-पुत्रांवरची टीका. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..