Special Report | कोरोना लस न घेणाऱ्यांनी दुसरी आणि तिसरी लाट आणली का?
1 डिसेंबरपासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यापैकी 68 टक्के लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. मागील काही दिवसांत राज्यात 151 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 102 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. या आकडेवारीवरुनही लसीच्या परिणामकारकतेची खात्री पटत नसेल तर एखदा मुंबईतील आकडेवारीवरही नजर टाकूया. फेब्रवारी 2021 ते जानेवारी 2022 या दरम्यान मुंबई आणि उपनगरात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले. त्यापैकी 94 टक्के लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता.
तुम्ही किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकाने कोरोनाची लस घेतली नसेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मागील फक्त 60 दिवसात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यातील 68 टक्के मृत्यू हे कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांचे झाले आहेत. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट असो वा ओमिक्रॉन, फक्त आणि फक्त लसच तुमचा जीव वाचवू शकते, हे पुन्हा पुन्हा आकडेवारीसह सिद्ध होत आहे. ज्या लोकांचा अजूनही कोरोना लसीवर विश्वास नाही. ज्या लोकांनी अजूनही कोरोनाची लस घेतलेली नाही, त्या लोकांचे डोळे उघडणारी माहिती समोर आली आहे.
1 डिसेंबरपासून आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्यापैकी 68 टक्के लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. मागील काही दिवसांत राज्यात 151 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 102 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. या आकडेवारीवरुनही लसीच्या परिणामकारकतेची खात्री पटत नसेल तर एखदा मुंबईतील आकडेवारीवरही नजर टाकूया. फेब्रवारी 2021 ते जानेवारी 2022 या दरम्यान मुंबई आणि उपनगरात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले. त्यापैकी 94 टक्के लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. वर्षभरात मुंबईत कोरोनामुळे 4 हजार 775 लोकांचा मृत्यू झाला. त्यातील तब्बल 4 हजार 320 लोकांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता.