Special Report | 2019 लोकसभेच्या वेळी पवारांची कुणामुळे माघार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र, ऐनवेळी पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला आहे.
बातमी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून शरद पवारांना माढा लोकसभा मतदारसंघातून आपणच घरी पाठवल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे माढ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांची रणनिती राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांवर भारी पडली होती का? अशा चर्चांना आता उधाण आलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र, ऐनवेळी पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला आहे.
Latest Videos