Special Report | Thane-Diva पाचव्या, सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण – Tv9
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी विविध रेल्वे प्रकल्पावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणात यावेळी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा उल्लेख आला आहे.
मुंबई : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी विविध रेल्वे प्रकल्पावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणात यावेळी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा उल्लेख आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केल्या या उल्लेखामुळे हा हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा तपाण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेनला आधीपासून अनेक राजकीय पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याविरोधात भूमिका मांडली आहे. तर शरद पवार यांनीही या मार्गाला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा कमी तर गुजरातमधील लोकांना याचा जास्त फायदा होईल असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे या हायस्पीड रेल्वेला महाराष्ट्रातून विरोध झाला आहे. रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली जात आहे.रेल्वेचं आधुनिकीकरण केलं जात आहे. मुंबई उपनगर रेल्वेची क्षमता वाढवायची आहे. 400 किलोमीटरचा विस्तार करायचा आहे. 19 स्टेशनांचं आधुनिककरण करणार आहोत. मुंबईतच नव्हे तर इतर राज्याशीही मुंबईच्या कनेक्टिव्हिटीत स्पीड आणि आधुनिकतेची गरज आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेची गरज आहे.असे मोदी म्हणाले आहेत.