Special Report | Uma Khapre यांच्याकडून Deepali Sayyed यांची राज्यपालांकडे तक्रार -tv9
पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर, शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांची तक्रार थेट राज्यपालांकडे करण्यात आलीय...भाजपच्या नेत्या उमा खापरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली..आणि दिपाली सय्यद यांच्यावर कारवाईची मागणी केलीय.
पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर, शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांची तक्रार थेट राज्यपालांकडे करण्यात आलीय…भाजपच्या नेत्या उमा खापरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली..आणि दिपाली सय्यद यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. राज्यपालांना भेटण्यासाठी खापरेंनी महिला आयोगाकडेही तक्रार केलीय.. पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्यानंतर, भाजपच्या उमा खापरे चांगल्याच आक्रमक झाल्या. खापरेंनी थेट घरात घुसून बदडून काढण्याची धमकीच दिली…पण मी तर वाटच पाहतेय, असं उत्तर दिपाली सय्यद यांनी दिलंय. दिपाली सय्यद आणि उमा खापरेंमधील वादाची सुरुवात ही किरीट सोमय्यांच्या वक्तव्यापासून झाली..सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर, दिपाली सय्यद यांनीही त्याच शब्दांचा वापर केला. दिपाली सय्यद यांच्यावर फडणवीसांनीही टीकास्त्र सोडलंय…सय्यद यांची पंतप्रधानांवरची टीका म्हणजे सूर्याकडे थुंकण्यासारखं असल्याचं फडणवीस म्हणालेत..
पंतप्रधान असो की मुख्यमंत्र्यांवरची टीका, शब्द जपूनच वापरायला हवेत..मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह शब्दाचा वापर करुन सोमय्यांनी सुरुवात केली..आणि आता हा वाद राज्यपालांकडे तक्रार करण्यापर्यंत पोहोचला..आता हा खेळ थांबवला पाहिजे असंही दिपाली सय्यद म्हणतायत खरं..पण भाजपचे कोणते नेते आतापर्यंत काय बोलले, याची आठवण करुन द्यायलाही त्या विसरत नाहीत…