Special Report | ‘गोवा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, फडणवीसांनी नागपुरातून रणशिंग फुंकलं
नागपुरात आज फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिलंय. 'राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे. प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केलाय. तसंच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.
गोव्यातील भाजपच्या विजयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. गोवा भाजप प्रभारी म्हणून फडणवीस यांनी रणनिती आखण्यापासून, उमेदवार निवड ते गल्ली बोळात जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. अशावेळी नागपुरात आज फडणवीसांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट आव्हान दिलंय. ‘राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाई शिगेला पोहचली आहे. प्रवीण दरेकरांना फसविण्याचा प्रयत्न झाला. तरीही तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणं थांबणार नाही, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. शेवटी फडणवीस यांनी गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा निर्धार केलाय. तसंच महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.