Special Report | भाजप-मनसेतली जवळीक वाढली-tv9
भाजपनं दुसऱ्या ठाकरेंना जवळ केल्याची चर्चा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसारख्या काही महापालिकांमध्ये मनसेची ताकद आहे. येत्या काही दिवसात राज्यात मोठ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत मनसेनं साथ दिल्यास भाजपला फायदा होऊ शकतो.
एक ठाकरे दूर गेले…दुसरे ठाकरे जवळ आले..शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड करुन नवं सरकार स्थापन केल्यापासून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जवळीक वाढलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.राज ठाकरेंनी फडणवीसांचं भगवी शाल देऊन स्वागत केलं. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी फडणवीसांचं औक्षणही केलं. राज्यात 25 वर्षे शिवसेना-भाजपची युती होती. पण 2019 साली मुख्यमंत्रिपदावरुन ही युती तुटली आणि भाजप-शिवसेना एकमेकांपासून दूर गेले. एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर हा दुरावा आणखी वाढलाय. त्यामुळं भाजपनं दुसऱ्या ठाकरेंना जवळ केल्याची चर्चा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसारख्या काही महापालिकांमध्ये मनसेची ताकद आहे. येत्या काही दिवसात राज्यात मोठ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत मनसेनं साथ दिल्यास भाजपला फायदा होऊ शकतो.