Special Report | टशन, महाराष्ट्र Vs केंद्र सरकार, वाराला प्रतिवार
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेनंतर ही बाब प्रकर्षाने दिसून येतेय. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, भावना गवळी, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांची नावं आर्थिक घोटाळ्यात घेतली गेली आहेत. त्यात अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यामागे ईडीची पिडा सुरु झाली आहे. तर महाविकास आघाडी सरकारकडूनही जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेनंतर ही बाब प्रकर्षाने दिसून येतेय. सध्या महाविकास आघाडी सरकारमधील अनिल देशमुख, छगन भुजबळ, अनिल परब, भावना गवळी, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांची नावं आर्थिक घोटाळ्यात घेतली गेली आहेत. त्यात अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यामागे ईडीची पिडा सुरु झाली आहे. तर महाविकास आघाडी सरकारकडूनही जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. अभिनेक्षी कंगना रनौतच्या बंगल्यावरील कारवाई, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाई हे त्याचंच उदाहरण आहे. इतकच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर तर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झालं होतं. तर अशाप्रकारे केंद्र आणि राज्यात सुरु असलेला कलगीतुरा, एक प्रकारचं टशन आपल्याला पाहायला मिळत आहे.