Special Report | कोरोनावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार

| Updated on: Jan 04, 2022 | 9:21 PM

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्य सरकारवर करोना काळात संथ गतीने काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकारने काय दिलं नाही याबाबत राज्यातील कुणी मंत्र्याने लेखी द्याव, असंही म्हटलं. राज्याने मागणी करूनही केंद्र सरकारने दिलं नसेल, तर मी या राज्याची हक्काची मुलगी म्हणून ती माहिती मला द्या, असंही भारती पवार म्हणाल्या.

‘राज्य सरकार मागतं आणि केंद्र सरकार देत नाही असं राज्यातील कुणी मंत्र्यांनी लेखी दिलं तर मलाही बरं होईल. आम्ही किती निधी दिलाय आणि त्यातील किती निधी राज्यात खर्च झाला हा पण प्रश्न उपस्थित होतो. केंद्र सरकारने आयसीयू बेड, ऑक्सिजनची क्षमता, औषधं यासाठी निधी मंजूर केलाय. प्रत्येक जिल्ह्याला औषधांचा साठा उपलब्ध पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून (NHM) देखील औषधांची मागणी करता येते’,असंही भारती पवार यांनी म्हटलंय.