Special Report | एकनाथ खडसेंनंतर ईडीच्या रडारवर आणखीन कोण?

Special Report | एकनाथ खडसेंनंतर ईडीच्या रडारवर आणखीन कोण?

| Updated on: Jul 08, 2021 | 8:49 PM

भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं खडसे म्हणाले. दरम्यान, खडसें पाठोपाठ महाविकास आघाडीतील अन्य नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज सक्तुवसुली संचलनालय अर्थात ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली. खडसे यांनी सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाताना मीडियाशी संवाद साधताना भाजपवर गंभीर आरोप केला. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं खडसे म्हणाले. दरम्यान, खडसें पाठोपाठ महाविकास आघाडीतील अन्य नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.