Special Report | ईडी CBIच्या मदतीनं घेणार अनिल देशमुखांचा शोध !
अनिल देशमुख कुठे आहेत? असा सवाल फक्त भाजप नेते उपस्थित करत नाहीत तर ईडीनेही केलाय.100 कोटी रुपये वसुली प्रकरणात ईडीने देशमुख यांना आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. मात्र, देशमुख अजूनही ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत. वारंवार समन्स बजावूनही गैरहजर राहिल्यानं देशमुखांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी आली आहे. त्यामुळे आता ईडीनं सीबीआयची मदत घेऊन देशमुखांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अनेकदा समन्स बजावले आहेत. असं असूनही देशमुख मात्र चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर होत नाहीत. त्याचबरोबर ईडी अधिकाऱ्यांना अनिल देशमुख कुठे आहेत? याचा थांगपत्ताही लागत नाही. त्यामुळे देशमुखांच्या शोधासाठी आता ईडीने केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात सीबीआयची मदत मागितली आहे. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत सवाल उपस्थित केलाय.