Special Report | आधी विस्तार लांबला, आता खातेवाटपही लांबणार?-TV9
मविआ सरकार कोसळल्यापासून या क्षणापर्यंत कुठल्याही खात्याला मंत्री नाही. त्यामुळं खातेवाटप लवकरात लवकर व्हावं आणि राज्याचा गाडा पुन्हा सुरळीत व्हावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.
नवं सरकार तयार झालं, 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण खातेवाटप कधी होणार आज रात्रीपर्यंत मंत्र्यांचं खातेवाटप होण्याची शक्यता आहे. मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी ही माहिती दिलीय. खातेवाटप होण्याआधी शिंदे गटाच्या आमदारांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. कामाची सुरुवात बाळासाहेबांच्या दर्शनानं करणार असल्याचं या मंत्र्यांचं म्हणणं आहे, नव्या मंत्रिमंडळात कुणाला कुठलं खातं मिळणार याची संभाव्य यादीही tv9 मराठीच्या हाती आलीय. खातेवाटप उद्याही होऊ शकतं अशी शक्यता अजित पवारांनी वर्तवलीय.मविआ सरकार कोसळल्यापासून या क्षणापर्यंत कुठल्याही खात्याला मंत्री नाही. त्यामुळं खातेवाटप लवकरात लवकर व्हावं आणि राज्याचा गाडा पुन्हा सुरळीत व्हावा अशीच अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.
Published on: Aug 11, 2022 09:53 PM
Latest Videos