Special Report | Raj Thackeray यांनी केलेल्या नक्कलांचा फ्लॅशबॅक-Tv9

Special Report | Raj Thackeray यांनी केलेल्या नक्कलांचा फ्लॅशबॅक-Tv9

| Updated on: Mar 12, 2022 | 9:44 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. इतकंच नाही तर राज यांनी संजय राऊत यांची नक्कलही केली. राज यांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं राजकारण हे नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं असल्याचा पलटवार संजय राऊत यांनी केलाय. राज ठाकरे यांनी आपली नक्कल केली त्यावर काय बोलाल? असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी संजय राऊतांना विचारला. त्यावेळी ‘नक्कल केली चांगील गोष्ट आहे. नक्कल मोठ्या माणसांची करतात. तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनी बोललं पाहिजे अशी स्थिती आहे. ईडीनं आम्हाला बोलावलं म्हणून गप्प बसलेलो नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. जे सत्य आहे त्यावर शिवसेना बोलणार डुप्लिकेट काही नाही. आमचं राजकारण नकलांवर उभं नाही. आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर उभं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांबद्दल उद्या पाहावं लागेल. काही लोक आजारी नसताना ही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्या इतक कुणीच सक्रिय नाही, म्हणून तर राज्य पुढं चाललंय’, असं संजय राऊत म्हणाले.