Special Report | महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर!
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं किर्तीकर म्हणाले. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या 25 /15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला […]
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं किर्तीकर म्हणाले. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या 25 /15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून “ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली. यापूर्वीही शिवसेनेच्या नेत्यांनी आणि आमदारांनी निधी वाटपावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.