Special Report | काल दापोली, आज सांगली…BJP आक्रमक-tv9
गोपीचंद पडळकर हे नेहमी पवार कुटुंबियांना टार्गेट करतात. आजही पुन्हा तेच दिसून आलं. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण पवारांच्या हस्ते करण्यास विरोध केला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर ही भाजपच्या ताफ्यातली राखीव तोफ आहे. जिथ कमी तिथं पडळकर मैदानात उतरतात. मग ते विद्यार्थ्यांचं आंदोनल असो, एसटीचे आंदोलन असो किवा कुठल्या पुतळ्याचा वाद असो, गोपीचंद पडळकर हे नाव रोज चर्चेत असतं. गोपीचंद पडळकर हे नेहमी पवार कुटुंबियांना टार्गेट करतात. आजही पुन्हा तेच दिसून आलं. गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण पवारांच्या हस्ते करण्यास विरोध केला. आणि धनगर बांधवांच्या म्हणजे मेंढपाळांच्या हस्ते आम्ही आजच पुतळ्याचे उद्घाटन करणार असा घाट घातला. बघता बघता गोपीचंद पडळकर हजारो कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरले. काही वेळातच त्यांना सदाभाऊ खोत यांची साथ मिळाली. कारण पिवळा शर्ट पिवळी टोपी घातून सदाभाऊही खांद्याला खांदा लावत मैदानात उतरले. आणि या जोडगोळीने पुतळ्याचं उद्घाटन आजच करणार असा इशारा सरकारला दिला. आणि तो खराही करून दाखवला. आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गनिमी काव्याचा वापर करत सरकारला हतबल केलं आहे.