Special Report | लतादीदींच्या कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओवरुन वाद
कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती आज समोर आली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या ऐतिहासिक जागेची विक्री होऊ नये यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. मात्र आज ही जागा विकली गेल्याचे माहिती समोह आली आल्यानंतर आता कोल्हापूरात नव्या वादाला तोंड फुटल आहे.
कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती आज समोर आली आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या ऐतिहासिक जागेची विक्री होऊ नये यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. मात्र आज ही जागा विकली गेल्याचे माहिती समोह आली आल्यानंतर आता कोल्हापूरात नव्या वादाला तोंड फुटल आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओमध्ये उभा करण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकिची कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षांपूर्वी विक्री केल्याचे उघड झाले आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओ परिसरात उभा करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार या जागेचा झाला आहे.