Special Report | कंपनी साळुंखे, पाटकरांची…मग संजय राऊत यांचं कनेक्शन काय ?
पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा वाद चांगलाच गाजत आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका चहावाल्याला या कोव्हिड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी या चहावाल्याचे जवळचे संबंध असल्यानेच त्याला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलं आहेत.
सध्या पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचा वाद चांगलाच गाजत आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे एका चहावाल्याला या कोव्हिड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी या चहावाल्याचे जवळचे संबंध असल्यानेच त्याला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलं आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या प्रकरणावर भाष्य करावं लागलं आहे. जम्बो कोविड सेंटरच्या कामात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा पवारांनी केला आहे.
राजीव साळुंखे असं या चहावाल्याचं नाव आहे. 4 जानेवारी 1975 ही त्यांची जन्म तारीख आहे. परळला केईएम हॉस्पिटलसमोर त्यांचं सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाचं हॉटेल आहे. गेल्या 70 वर्षांपासूनचं हे हॉटेल आहे. त्यांचे वडील हे हॉटेल चालवायचे. आता राजीव साळुंखे चालवतात. याच परिसरात राजीव यांचं निवास आहे. ते सुजीत पाटकर यांच्या कंपनीत पार्टनर आहेत. सुजीत पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे.