Special Report | अजित पवार...किरीट सोमय्या यांचं नवं टार्गेट!

Special Report | अजित पवार…किरीट सोमय्या यांचं नवं टार्गेट!

| Updated on: Sep 09, 2021 | 10:27 PM

अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. सातशे कोटींचं कर्ज घ्यायचं असेल तर त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन 1 हजार कोटी असलं पाहिजे. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले.

किरीट सोमय्या यांनी आजच्या पत्रकार परिषेदत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. सातशे कोटींचं कर्ज घ्यायचं असेल तर त्या कारखान्याचं व्हॅल्युएशन 1 हजार कोटी असलं पाहिजे. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले. 65 कोटीच्या व्हॅल्यूएशनवर 700 कोटींचं कर्ज काढलं?, शरद पवार साहेब यासाठी तुम्हाला सहकार चळवळ हवीय का? असा सवाल सोमय्यांनी केला.

सोमय्यांनी आज अजित पवार यांच्यामध्ये हिम्मत असेल तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65 कोटीत कारखाना घेतला अन 700 कोटीच बँकेचे कर्ज घेतले, असं सोमय्या म्हणाले. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही ते म्हणाले.

Published on: Sep 09, 2021 10:27 PM