Special Report | लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 9 मृत्यू, लखीमपूर घटनेचा नवीन व्हिडीओ समोर

Special Report | लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 9 मृत्यू, लखीमपूर घटनेचा नवीन व्हिडीओ समोर

| Updated on: Oct 05, 2021 | 9:10 PM

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ विविध राजकीय पक्षांकडून लखीमपूरमधला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा पराक्रम गाजवला असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. लखीमपूर खीरी इथला हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडीओ विविध राजकीय पक्षांकडून लखीमपूरमधला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे. टीव्ही 9 मराठी या व्हिडीओची पुष्टी करत नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागून गाडी येते आणि जोरात धडक देऊन त्यांना चिरडते असं व्हिडीओमध्ये दिसतं. काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा व्हिडीओ लखीमपूरमधला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.