Special Report | ठाकरे सरकारचे 10 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता अधिक कठोर निर्बंध लावण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे हिवाळी अधिवेशनानंतर पाच दिवसांत 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे, असं आवाहनही अजितदादांनी केलंय.
कालपर्यंत फक्त ठाकरे सरकारच्या फक्त ५ मंत्र्यांनाच कोरोना झाल्याची माहिती होती. मात्र 5 नव्हे तर तब्बल 10 मंत्र्यांना कोरोना झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. म्हणजे ठाकरे सरकारमधल्या 32 मंत्र्यांपैकी सध्या 10 मंत्री कोरोनाबाधित आहेत आणि जवळपास 20 हून जास्त नेत्यांनाही लागण झालीय.
यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील
पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
आणि आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झालीय.
विशेष म्हणजे ही सर्व नेतेमंडळी फक्त मागच्या ४ दिवसात बाधित झाली आहेत.