Special Report | विधानसभेतील राडा आणि ओबीसीच्या मुद्द्यांवरून फडणवीस-ठाकरे आमनेसामने

Special Report | विधानसभेतील राडा आणि ओबीसीच्या मुद्द्यांवरून फडणवीस-ठाकरे आमनेसामने

| Updated on: Jul 06, 2021 | 9:38 PM

सोमरवारी (5 जुलै) भाजपने अधिवेशनात जो गोंधळ गेला त्यामुळे राज्याची मान शरमेनं खाली आली. या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल केलाय. सोमरवारी (5 जुलै) भाजपने अधिवेशनात जो गोंधळ गेला त्यामुळे राज्याची मान शरमेनं खाली आली. या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसींबद्दलचा द्वेष उफाळून आला, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच जी माहिती पंतप्रधान मोदींची भेट घेऊन मागितली ती अधिकृत ठराव करुन मागितली. यात चुक काय? असाही सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधी पक्षाने सोमवारी (5 जुलै) केलेलं वर्तन राज्याची मान शरमेने खाली नेणारं होतं. याला कारण काय होतं तर ओबीसी समाजासाठी जे राजकीय आरक्षण आणलं गेलं त्याबद्दलची माहिती केंद्र सरकारकडे मागितली. ही माहिती मागणं हा गुन्हा आहे का? मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान मोदींना भेटायला गेलो होतो. आम्ही त्यांना भेटून या माहितीची मागणी केली. राज्यपालांनाही पत्र देऊन मागणी केलीय. भाजपला ती माहिती निरुपयोगी वाटत होती तरी त्यांनी सरकारला वाटतंय तर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकजुट दाखवत पाठिंबा द्यायला हवा होता. पण या गोंधळातून भाजपच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलचा द्वेष उफाळून वर आला.”