Special Report | मुंबईत कोरोनाचे 94% मृत्यू लस न घेतलेल्यांचे !
कोरोना लस कशी संजीवनी आहे आणि लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना कसा जीवघेणा ठरतोय. हे मुंबई महापालिकेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. लस न घेणाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण कोरोना मृत्यूपैकी 94 टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. तर 6 टक्के लस घेतल्यानंतरही रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत 4 हजार 575 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला.
कोरोना लस कशी संजीवनी आहे आणि लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना कसा जीवघेणा ठरतोय. हे मुंबई महापालिकेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. लस न घेणाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण कोरोना मृत्यूपैकी 94 टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. तर 6 टक्के लस घेतल्यानंतरही रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीत 4 हजार 575 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. त्यापैकी 4 हजार 320 रुग्णांनी लसच घेतली नव्हती. तर 225 जणांचा लस घेऊनही कोरोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला.
कोरोनाच्या प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली होती…येत्या 16 तारखेला एक वर्ष पूर्ण होणार…मात्र लसीकरणाबाबत गैरसमज आणि मनातल्या भीती पोटी लस न घेणाऱ्यांची संख्या अजूनही मोठी आहे. मुंबईचा जर विचार केला तर, सोमवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 1 कोटी 84 लाख 55 हजार नागरिकांचं लसीकरण झालंय. यापैकी पहिला डोस हा 1 कोटी 12 लाख 217 लोकांचा झालाय. तर 83 लाख 17 हजार 154 मुंबईकरांनी दुसरा डोस घेतलाय.