Special Report | कोकणात शिवसेना Vs नारायण राणे वाद

Special Report | कोकणात शिवसेना Vs नारायण राणे वाद

| Updated on: Dec 19, 2021 | 11:36 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याकडेच राहणार आहेत. या नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद असून आम्ही चारही नगरपरिषदा जिंकूच, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले.

वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते मीडियाशी बोलत होते. जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्यांनी यावं आणि नगरपरिषदा घेऊन जाव्या असं व्हायला आम्ही काही डोळे मिटून आहोत का?. शिवसेनेची ताकद काय आहे? चारही नगरपरिषदा आमच्या आहेत. आमच्याकडेच राहणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद आहे. चारही नगरपरिषदा आम्ही आमच्या ताब्यात येऊ द्या. या सरकारने जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांना पैसे कुठे दिले? एवढं नुकसान झालं. पण पाच पैसे दिले नाही. मग मतदारांनी यांना निवडून का द्यावं, असा सवाल त्यांनी केला.