Special Report | Narayan Rane यांचा Ajit Pawar आणि Uddhav Thackeray यांना थेट इशारा

Special Report | Narayan Rane यांचा Ajit Pawar आणि Uddhav Thackeray यांना थेट इशारा

| Updated on: Feb 26, 2023 | 12:34 AM

अजित पवार यांनी नारायण राणे यांना डिवचलं तर राणे देखील संतापले आहेत. त्यांनी पुण्यात अजितदादांचे बारा बाजवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

मुंबई : पोटनिवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. सोबत आरोप-प्रत्यारोप देखील वाढत आहेत. अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी वांद्य्राच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्यावर बोचरी टीका केली. त्यावर आता नारायण राणे यांनी देखील चांगलीच टीका केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित दादांना थेट पुण्यात येऊन बारा वाजवण्याचा इशारा दिला आहे. अजित पवार यांनी अॅक्शन करुन राणेंवर टीका केली होती. त्यानंतर आता राणे चांगलेच संतापले आहेत. शिवसेना सोडणाऱ्या राणेंना वांद्र्यात बाईनं पाडलं, म्हणत अजित दादांनी राणेंना डिवचलं. त्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.

अजित पवार आणि नारायण राणे आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी महाविकासआघाडी सरकार असतानाही अजित दादांनी लघू आणि सुक्ष्म म्हटल्यानं दोघांमध्ये खटके उडाले होते.नारायम राणे यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनाही नवा इशारा दिलाय.शिंदे गटाच्या आमदारांना खोक्यांवरुन डिवचतात, पण ठाकरेंचे खोके घेतानाच्या कॅसेट्स आपल्याकडे असल्याचं राणे म्हणाले.

( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )

Published on: Feb 25, 2023 10:46 PM