Special Report | Sanjay Raut यांना उत्तर देण्यासाठी Narayan Rane मैदानात - Tv9

Special Report | Sanjay Raut यांना उत्तर देण्यासाठी Narayan Rane मैदानात – Tv9

| Updated on: Feb 16, 2022 | 9:11 PM

नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे.

मुंबई : संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफा डागल्यानंतर भाजप नेत्यांनी आता राऊतांविरोधात रान उटवलं आहे. कालपासून अनेक नेत्यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच राऊतांना अनेक सवालही केले आहेत. आता एवढं राजकारण तापलं असताना. नारायण राणे कसे गप्प बसतील. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचे वाभाडे काढले आहेत. संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे. यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे. संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत. असा आरोप राणेंनी केला आहे. संजय राऊत लोकप्रभात असताना उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, आता म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने…तू पत्रकार नाहीच, संपादक नाही. तुझी भाषा त्या गुणवत्तेची नाहीच. बेकार आरोप करतो. हा काल अस्वस्थ का झाला, हा काल असा बेजाबदार का बोलत होता, प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर याचा थयथयाट झाला. असा घणाघातही राणेंनी केला आहे.