Special Report | Narayan Rane यांचे 2 बंगले कारवाईच्या रडारवर! -tv9

Special Report | Narayan Rane यांचे 2 बंगले कारवाईच्या रडारवर! -tv9

| Updated on: Feb 21, 2022 | 9:45 PM

नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर आज बीएमसीचं पथक पोहोचलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक काही पहिल्यांदा गेलेलं नाही. यापूर्वीदेखील त्यांना नोटीस देण्यात आली होती.

मुंबईः नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर आज बीएमसीचं पथक पोहोचलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या,’राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक काही पहिल्यांदा गेलेलं नाही. यापूर्वीदेखील त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या घरी महापालिकेचं पथकही गेलेलं आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या सीआरझेड कायद्यालं उल्लंघन केल्याची तक्रार आहे, त्याच्याच तपासणीसाठी महापालिकचं पथक गेलं आहे. स्वतः राणे साहेबांनी सांगितलं होतं. काही पोर्शन अनधिकृत जाणवतोय, त्यामुळे हे पथक चौकशीसाठी आलं होतं. आताही हे पथक चौकशी करतंय. राणे साहेबही त्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे.’