Special Report | Narendra Modi आणि Sharad Pawar यांच्या 20 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? -Tv9

Special Report | Narendra Modi आणि Sharad Pawar यांच्या 20 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? -Tv9

| Updated on: Apr 06, 2022 | 9:06 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केल्याने आता तरी ईडी सबुरीने घेणार का? असा सवाल विचरण्यात येत आहे. शिवसेना नेते राऊतांवर अन्याय झाला याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिल्याची माहिती शरद पवार आज दिल्लीत दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांबाबत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार केल्याने आता तरी ईडी सबुरीने घेणार का? असा सवाल विचरण्यात येत आहे. शिवसेना नेते राऊतांवर अन्याय झाला याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिल्याची माहिती शरद पवार आज दिल्लीत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, आमदार, खासदारांवरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींचा सपाटा सुरू आहे. अशातच आता तर आयकर विभाग थेट उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीपर्यंत कारवाई पोहोचवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती आयकर विभागाकडून काही दिवसांपूर्वीच जप्त केली. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त करत शिवसेनेला दुसरा दणका दिला. या धाडसत्रानंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमधील वाद आता टोकाला पोहोचला आहे.