Special Report | नवाब मलिक यांना अटक!...आता पुढचा नंबर कुणाचा ?

Special Report | नवाब मलिक यांना अटक!…आता पुढचा नंबर कुणाचा ?

| Updated on: Feb 23, 2022 | 11:20 PM

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका आणि इशारा देण्याचं काम हे नेते करत होते. संजय राऊत, नवाब मलिक, किरीट सोमय्या, मोहित कंबोज या नेत्यांनी एकमेकांना इशारे दिले. त्यानंतर आता मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अशावेळी आता दुसरा नंबर कुणाचा? असा सवाल हळू आवाजात राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अटकेनंतर मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी ईडीने मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय. दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. एकमेकांवर टीका आणि इशारा देण्याचं काम हे नेते करत होते. संजय राऊत, नवाब मलिक, किरीट सोमय्या, मोहित कंबोज या नेत्यांनी एकमेकांना इशारे दिले. त्यानंतर आता मलिक यांना अटक करण्यात आली आहे. अशावेळी आता दुसरा नंबर कुणाचा? असा सवाल हळू आवाजात राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.