Special Report | …तर NCB च्या कारवाईवरुन राष्ट्रवादीला शंका
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि भाजपवर जोरादर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि एनसीबीच्या संगनमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि भाजपवर जोरादर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि एनसीबीच्या संगनमताने बॉलिवूडमध्ये भीती निर्माण करून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. एनसीबी आणि भाजपच्या संगमताने बॉलिवूडला बदनाम करणे आणि बऱ्याच लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे काढण्याचे उद्योग सुरू आहेत, असं सांगतानाच कुणाचे कुणाशी काय लागेबांधे आहेत, याची माहिती मी पुढील काळात देणार आहे, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.
भाजपचे लोक आधी सांगतात त्यानंतर कारवाया होत आहेत. म्हणजे ठरवून कारवाया होत आहेत हे स्पष्ट होत असून यापेक्षा वेगळ्या पुराव्याची गरज नाही. भाजपचे लोक एनसीबीचे अधिकारी बनून लोकांना हाताला धरून नेत आहेत. एनसीबीचे लोक फरारी आरोपीची साथ घेत आहेत. म्हणजे या देशात कायद्याचं राज्य आहे की नाही हा मोठा प्रेश्न चिन्हं निर्माण झाला आहे, असा सवाल त्यांनी केला.