Special Report | वर्धापनदिन राष्ट्रवादीचा, कौतुक शिवसेनेचं; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण

Special Report | वर्धापनदिन राष्ट्रवादीचा, कौतुक शिवसेनेचं; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण

| Updated on: Jun 10, 2021 | 9:28 PM

ष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पवारांनी विधानसभा आणि लोकसभेतही आघाडी एकत्र राहण्याचे संकेत दिले आहेत.

स्थानिक पातळीवरील निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पवारांनी विधानसभा आणि लोकसभेतही आघाडी एकत्र राहण्याचे संकेत दिले आहेत. असं असलं तरी राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकीसाठी असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. (Shivsena is trustworthy party Appreciation from NCP chief Sharad Pawar)