Special Report | आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी !
संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्यावर आज पुन्हा एकदा सत्रन्यायालयात सुनावणी पार पडली. पण, जामीन अर्जावर कोणताही निर्णय झाला नाही. सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 18 डिसेंबरपासून राकेश परब हल्ल्या प्रकरणात ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्या अजूनही सुरू आहेत.
संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्यावर आज पुन्हा एकदा सत्रन्यायालयात सुनावणी पार पडली. पण, जामीन अर्जावर कोणताही निर्णय झाला नाही. सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 18 डिसेंबरपासून राकेश परब हल्ल्या प्रकरणात ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्या अजूनही सुरू आहेत. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती मात्र सरकारी वकीलांनी प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे असा अर्ज केल्याने आजही नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होवू शकली नाही. यावर सरकीर पक्ष वेळ काढूपणा करतोय, असा आक्षेप नितेश राणे यांच्या वकीलांनी नोंदवला. मात्र, सुनावणी सोमवारीच होणार असल्याने नितेश राणे यांना पुढील काही दिवस तरी न्यायालयीन कोठडीत काढावी लागणार आहे.
Published on: Feb 05, 2022 09:52 PM
Latest Videos