Special Report | देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' संन्यास वक्तव्यावरून चिमटे

Special Report | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ संन्यास वक्तव्यावरून चिमटे

| Updated on: Jun 28, 2021 | 9:38 PM

माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून जोरदार पलटवार करण्यात येत आहे. संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी फडणवीसांना त्यांच्या वक्तव्यावरुन चांगेलच टोले लगावले आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडलं. यावेळी फडणवीसांनी सरकारवर तुफान हल्ला चढवला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून जोरदार पलटवार करण्यात येत आहे. संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी फडणवीसांना त्यांच्या वक्तव्यावरुन चांगेलच टोले लगावले आहेत.