Special Report | महाराष्ट्राच्या 2 मोठ्या शहरात ओमिक्रॉन, पुढे काय?
ओमिक्रॉनचं नाव मोठं मात्र लक्षण छोटं असंच काही सुरूवातील तरी दिसून येते आहे. कारण ओमिक्रॉनमुळे अजून तरी एकही मृत्यू झाला नाही. रुग्णवाढ मात्र झपाड्याने होते आहे.
मुंबई : ओमिक्रॉनचं नाव मोठं मात्र लक्षण छोटं असंच काही सुरूवातील तरी दिसून येते आहे. कारण ओमिक्रॉनमुळे अजून तरी एकही मृत्यू झाला नाही. रुग्णवाढ मात्र झपाड्याने होते आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरुन 25 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे सिध्द झाले आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि 25 नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या 36 वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे. दरम्यान, या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या 5 अतिजोखमीच्या आणि 15 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.