Special Report | देवेंद्र फडणवीसांचा प्लॅन B तयार आहे का ?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर चांगली गोष्ट आहे. आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई: मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… असं निवडणूक प्रचाराच्या भाषणात सांगणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ‘मन की बात’ सांगितली आहे. आता तर चक्क त्यांनी मी मुख्यमंत्री नाही असं मला वाटतच नाही, असं जाहीर विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीसांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर चांगली गोष्ट आहे. आनंद आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.