Special Report | दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सत्य बाहेर येणार? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत आणि दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मोठी माहिती दिली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कसं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मुंबई : एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मोठी माहिती दिली आहे. “सुरुवातीला सुशांतच्या प्रकरणात कोणते ठोस पुरावे नव्हते. जी काही माहिती उपलब्ध होती की ऐकिवातली माहिती होती. नंतर काही लोकांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. या लोकांशी संपर्क साधला गेला आणि पोलिसांकडे ते पुरावे सादर करण्यास त्यांना सांगण्यात आलं. तरीही जेवढे पुरावे सध्या उपलब्ध आहेत त्यानूसार त्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पुराव्यांची पडताळणी सुरू असल्यानं आता मी यावर काही बोलणं योग्य होणार नाही,” असं फडणवीस म्हणाले. दिशा सालियन हिची हत्या झालाचा दावा नारायण राणे यांनी वारंवार केला आहे. आता यापुढे हे प्रकरण कसे पुढे जाणार यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…