Special Report | 280 कोटींच्या नोटांचं घबाड, नोटा पाहून अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले

Special Report | 280 कोटींच्या नोटांचं घबाड, नोटा पाहून अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले

| Updated on: Dec 27, 2021 | 10:05 PM

पियुष जैन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीयूष जैनच्या अटकेवर, निवासी परिसरातून जप्त केलेली रोकड जीएसटी न भरता वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आहे, असे पीयूष जैनने कबूल केल्याचे डीजीजीआयने म्हटले आहे.

अत्तर व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छापेमारीनं सगळेच चक्रावले. नोटांच्या घबाडाला पाहून छापेमारी केलेलाही चकीत होऊन गेले. जिथे-तिथे सर्वत्र नोटाचनोटा आढळून आल्यानं सगळ्यांच्या डोळ्याच्या भुवया उंचावल्या होत्या. अधिकाऱ्यांना छापेमारीआधी कल्पनाही नव्हती की कुठंकुठं नेमकं काय काय लपवलेलं असे. तब्बल दीडशे तास उलटूनही हे काम सुरुच होतं. दरम्यान, प्राप्तिकराच्या छाप्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला कथित परफ्यूम व्यापारी पियुष जैन याला अखेर न्यायालयात हजर करण्यात आले. पियुष जैन याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीयूष जैनच्या अटकेवर, निवासी परिसरातून जप्त केलेली रोकड जीएसटी न भरता वस्तूंच्या विक्रीशी संबंधित आहे, असे पीयूष जैनने कबूल केल्याचे डीजीजीआयने म्हटले आहे. ओडोकेम इंडस्ट्रीज, कन्नौज द्वारे मोठ्या प्रमाणात जीएसटी चोरी झाल्याचे सूचित केले आहे. रेकॉर्डवर उपलब्ध पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

Published on: Dec 27, 2021 10:05 PM