Special Report | एसटी संप कोण ताणतंय? सरकार की संपकरी ?
आज मंत्रालयावर सुद्धा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनेक कर्मचारी हे त्रस्त झाले आहेत. ते टोकाचं पाऊल उचलत आहेत.
एसटी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. सरकारकडून खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी आहेत. सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. एसटीचे विलीनीकरण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून सुरू झालेला संप अजूनही सुरूच आहे. तर सरकारचे योग्य प्रयत्न सुरु असल्याचं सरकारचं म्हणनं आहे, त्यामुळे एसटी संप कोण ताणतंय? सरकार की संपकरी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos