Special Report | कथित महिला डीसीपीची फुकटेगिरी व्हायरल, गृहमंत्री वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश

Special Report | कथित महिला डीसीपीची फुकटेगिरी व्हायरल, गृहमंत्री वळसे-पाटलांकडून चौकशीचे आदेश

| Updated on: Jul 31, 2021 | 5:23 AM

एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याचा अट्टाहास पुण्यातील महिला डीसीपीच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. “ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Special Report | एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याचा अट्टाहास पुण्यातील महिला डीसीपीच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. “ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना याबाबतची पूर्ण चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त महिलेने पोलीस कर्मचाऱ्याकडे केलेल्या या फर्माईशीची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. TV9 मराठीने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. | Special report on Women DCP and Biryani order in Pune Dilip Walse Patil

Published on: Jul 30, 2021 11:23 PM