Special Report | Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, मनसेचं मात्र अद्याप मौन-TV9
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदारांना मनसेच्या वसंत मोरेंनी आपल्या परीनं उत्तर दिलं. पण मुळात भोंगाविरोधी आंदोलनच ज्यांना पटलं नाही, त्या वसंत मोरेंपुढे आता अयोध्या दौऱ्याच्या विरोधाच्या इशाऱ्यावर काय बोलावं, हा सुद्धा पेच होता.
राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदारांना मनसेच्या वसंत मोरेंनी आपल्या परीनं उत्तर दिलं. पण मुळात भोंगाविरोधी आंदोलनच ज्यांना पटलं नाही, त्या वसंत मोरेंपुढे आता अयोध्या दौऱ्याच्या विरोधाच्या इशाऱ्यावर काय बोलावं, हा सुद्धा पेच होता. वसंत मोरेंच्या या उत्तराच्या काही तासानंतर राज ठाकरेंनी एक आदेश काढला. माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कुणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षानं प्रवक्ते नेमलेले आहेत. ते यावर बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करु नये. सोशल मीडियात राज ठाकरेंचे हे लेटर व्हायरल झालं. ज्यात राज ठाकरेंनी शहाणपणा न करण्याचा सल्ला वसंत मोरेंनाच दिल्याच्या चर्चा रंगल्या….मात्र वसंत मोरेंच्या दाव्यानुसार तो सल्ला त्यांच्यासाठी नव्हताच. अयोध्या दौऱ्यावरुन भाजप खासदार बृजभूषण सिंहांनी दिलेल्या इशारावजा धमकीवर मनसेच्या प्रवक्त्यांशीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला.