Special Report | पंकजा मुंडेंना वारंवार डावललं जातंय?-TV9

Special Report | पंकजा मुंडेंना वारंवार डावललं जातंय?-TV9

| Updated on: Aug 11, 2022 | 10:10 PM

माझी पात्रता नसेल..त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील..कार्यकर्ते पण शांत बसलेत..मी पण शांत बसलेत..त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही...

मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यानं शिंदे गटाचे काही नेते नाराज झाले. बच्चू कड़ूंनी तर माध्यमांसमोर येत सरळसरळ नाराजी व्यक्त केली. पण आता भाजप नेत्यांचीही नाराजी बाहेर आलीय. त्यातल्याच एक आहेत..भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रातल्या भाजप नेतृत्वाला टोला मारला. अर्थातच विषय होता. मंत्रिमंडळ विस्ताराचा.. माझी पात्रता नसेल..आणखी पात्रतेची लोक असतील..माझी पात्रता नसेल..त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील..कार्यकर्ते पण शांत बसलेत..मी पण शांत बसलेत..त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही…

 

Published on: Aug 11, 2022 10:00 PM