Special Report | कथित कोव्हिड घोटाळ्यावरुन राजकारण तापलं -tv9
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करा. त्यांनाही उपचार मिळाला पाहिजे. तसं असेल तर ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना तुरुंगात दाखल करणार का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला. स्पर्धा चाललीये. जे हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट केले आहेत. त्यात दाखल करणार का? हातपाय तोडले तरी किरीट सोमय्या लढत राहणार. राज्याला घोटाळेमुक्त करणार, असा इशाराही सोमय्या यांनी दिला. आतापर्यंत मला 14 नोटीसा आल्या. नोटीसा येणं आता नवं राहिलं नाही. सगळेच नोटीसा काढतात. नंतर हेच नोटीसा काढणारे तुरुंगात जातात, असा टोमणाही त्यांनी लगावाला. किरीट सोमय्या यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दोन पोलीस हवालदारांना पुणे हल्ल्यांबद्दल निलंबित केलं, काय ऋडलं नाही तर का निलंबित केलं, एवढं का घाबरलात?, कोविड घोटाळा बाहेर येतोय त्यामुळे ठाकरे घाबरले आहेत. कोव्हिड घोटाळेबाजांना सजा होणार. तुम्ही ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपन्यांना टेंडर कसं दिलं? सजा होणारच, असं किरीट सोमय्या म्हणाले.