Special Report | राष्ट्रवादीच्या प्राजक्त तानपुरेंमागे ED चा ससेमिरा का लागला?
नागपूरच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याचा खरेदी-विक्री व्यवहार सध्या ईडीच्या रडारवर आहे आणि त्यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंमागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. नागपूरच्या सावनेरमध्ये 1995 साली राम गणेश गडकरी साखर कारखाना उभा राहिला. त्यानंतर जवळपास 10 ते 12 वर्ष कारखाना चालला, पण नंतरच्या काळात थकबाकी आणि गाळपासाठी ऊस पुरेसा नसल्यामुळे कारखान्यावर जप्ती आली.
नागपूरच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याचा खरेदी-विक्री व्यवहार सध्या ईडीच्या रडारवर आहे आणि त्यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंमागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. नागपूरच्या सावनेरमध्ये 1995 साली राम गणेश गडकरी साखर कारखाना उभा राहिला. त्यानंतर जवळपास 10 ते 12 वर्ष कारखाना चालला, पण नंतरच्या काळात थकबाकी आणि गाळपासाठी ऊस पुरेसा नसल्यामुळे कारखान्यावर जप्ती आली. 2007 साली राज्य सहकारी बँकेनं कारखाना ताब्यात घेत लिलावासाठी काढला आणि त्याच लिलावप्रकियेचे व्यवहार ईडीच्या रडारवर आलेयत.
ईडीतल्या सुत्रांच्या माहितीनुसार जप्तीनंतर लिलावासाठीची राखीव किंमत 26 कोटी इतकी ठरवली गेली होती. मात्र प्रत्यक्षात कारखान्याची विक्री 13 कोटीला झाली. कारखाना विकत घेणाऱ्या कंपनीची मालकी मंत्री प्राजक्त तनपुरेंचे वडिल प्रसाद तनपुरेंकडे होती. 2007 मध्ये प्रसाद तनपुरेंच्या शुगर अँड अलायड ऍग्रो प्रॉडक्टस या कंपनीनं हा कारखाना खरेदी केला. कारखान्याची किंमत 26 कोटी असूनही 13 कोटीला कसा विकला गेला. सरफायसी कायद्याच्या तरतुदीनुसार कर्जदारांच्या संमतीशिवाय कारखान्याची विक्री कशी झाली. असे अनेक प्रश्न ईडीच्या चौकशीतून पुढे आले आहेत.