Special Report | शिवसेना-भाजप वादाचा नवा अंक पुण्यात?
राऊतांच्या कोथळा बाहेर काढण्याच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकंच नाही तर संजय राऊत यांनी पुण्यात येऊन दाखवावं, असा इशाराच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलाय. भाजपचा हा इशारा आता शिवसेनेनं अंगावर घेतला. राऊतांना अडवून दाखवा, शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिलंय.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आणि हल्लाबोल काही थांबण्याचं नाव घेत नाही. चंद्रकांत पाटील यांचं पाठित खंजीर खुपसल्याचं वक्तव्य आणि त्यानंतर राऊतांनी कोथळा बाहेर काढण्याचं केलेलं विधान यावरुन हा वाद अधिकच पेटला आहे. राऊतांच्या कोथळा बाहेर काढण्याच्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकंच नाही तर संजय राऊत यांनी पुण्यात येऊन दाखवावं, असा इशाराच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिलाय. भाजपचा हा इशारा आता शिवसेनेनं अंगावर घेतला. राऊतांना अडवून दाखवा, शिवसेना स्टाईलने उत्तर मिळेल, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिलंय.
Published on: Sep 08, 2021 10:26 PM
Latest Videos