Special Report | पती राज कुंद्रावरील आरोपांबाबत शिल्पानं मौन सोडलं
राज कुंद्रा (Raj Kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात 23 जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेने शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) जबाब नोंदवला होता. शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिलेल्या जबाबाचा तपशील समोर आला आहे. आपल्या जबाबात अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणाली की, तिने राज कुंद्राला त्याच्या कामाबद्दल कधीच काही विचारले नाही. ती स्वतः तिच्या कामात व्यस्त होती. हॉटशॉट अॅपबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे शिल्पा म्हणाली. राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे.

शिल्पा शेट्टीने पोलिसांना सांगितले की, राज कुंद्रा 2019 मध्ये आर्म्सप्राईम मीडिया कंपनीत सामील झाला होता. सौरव कुशवाह त्याचे साथीदार होते. ही कंपनी पूनम पांडे सारख्या अभिनेत्रींचे छोटे व्हिडीओ बनवायची, ज्यामध्ये अभिनेत्री एक्स्पोज करायच्या. हे सर्व त्यांच्या इच्छेनुसार केले गेले होते. मी राजला त्याबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला की, हा ओटीटी प्लॅटफॉर्म चांगले काम करत आहे आणि त्याला त्यातून चांगला नफा मिळत आहे. यानंतर राज काही कारणांमुळे सौरव कुशवाह पासून वेगळा झाला.